स्त्री शक्ती फाउंडेशनने केली 'हिरकणी योध्यांची' निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 30, 2025

स्त्री शक्ती फाउंडेशनने केली 'हिरकणी योध्यांची' निवड

 स्त्री शक्ती फाउंडेशनने केली 'हिरकणी योध्यांची' निवड



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महिलांच्या अत्याचार वर खूप समस्या ऐकण्यात येत आहेत त्या करिता स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन ने एक मोठा पाऊल उचलले आहे.सोलापूरात स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन चे हिरकणी योद्धा म्हणून 8 महिलांची निवड करण्यात आली. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी, महिलांच्या हिता साठी ,महिलांच्या उद्योग व रोजगार, तसेच फाउंडेशन च्या माध्यमांतून उभी राहणारी चळवळ, अनेक उपक्रम ,महिलांवरील होणारे अत्याचार इतर सर्व महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या वतीने ही कोअर कमिटी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. भाग्यश्री राठोड,माधवी अंधे,प्रिया मेहेरकर,आशा फुलेवार,शिल्पा गाईगवळी,निशा मरोड,मिनाक्षी पट्टनशेट्टी,स्वाती खरवळे यांची निवड करण्यात आली. स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन ची साथ कायम महिलांच्या पाठीशी आहे.महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन कायम तत्पर आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्षा कु.किरण माशाळकर म्हणाल्या आणि सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages