Hot Posts

6/recent/ticker-posts

बनावट नोटरी आणि करारपत्राद्वारे प्लॉट विक्री; २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल

 बनावट नोटरी आणि करारपत्राद्वारे प्लॉट विक्री; 

२२ जणांविरुध्द गुन्हा दाखल

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महापालिकेच्या हद्दवाढ भागातील मजरेवाडी आणि विविध नगरांमधील प्लॉट संदर्भातील बनावट नोटरी आणि कब्जा पावतीसह करारपत्र तयार करुन त्याची विक्री केल्यानंतर हे दस्तऐवज महापालिका मिळकत नोंदीसाठी सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत महापालिका मालमत्ता कर विभागाचे सहाय्यक कर अधिकारी सूर्यकांत खसगे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यावरुन २२ जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलीस तपासात आणखी अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याप्रकरणी ख्वाजाभाई शब्बीर शेख, संजय मधुकर जाधव, रोहन रमेश पगडे, अश्फाक अली मुस्ताक अली सय्यद, नॉस नूर अहमद निलगुंडे, नरेश राजय्या दुडम, रजिया गुलाम अब्बास शेख, इक्बाल महेबूब शेख, रेश्मा वाहिद कोतकुंडी, जब्बार हुसेन बागवान, रेश्मा जावेद पिरजादे, एहतेशाम अजमुद्दिन हिप्परगी, रेश्मा नुरोद्दीन ड्रंके, आसिफ मौलाली मोमीन, लतिफा बेगम रफिक पिरजादे, जरीन बाबू पटेल, आसिफ सत्तार शेख, अल्ताफ हुसेन गौस, अझरुद्दीन मुनाफ सय्यद, नागय्या शिवलिंगप्पा स्वामी, हुसेन खाजाभाई कटोर, सुरेश केरप्पा जंगम असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ यादरम्यान हद्दवाढ भागातील क्रमांक ६७ मजरेवाडीस्थित राजीव गांधी नगर येथील प्लॉट नं. ११२, १४५, २०२, २०७, २३४, २४८, २६३, २८०, २८४, शिवपार्वती नगरमधील प्लॉट क्रमांक ६, ४९, ३०६, ३०७, ३०८, १३३, ७३८, ७३९, ८९१, ७४१, १३१, १०२७, १०२८, १०२२, १०२३, ८९६, ३१९, ७२५, ७४०, ६५१, ७१२, ८७७, ७४३, ७४५, ७२१, ७२२, ८८८. ये मुलवाडीमधील प्लॉट नंबर ६३ /अ, ६४/अ, चंद्रकला नगरमधील प्लॉट नंबर २५५ आणि सत्यसाई नगरमधील प्लॉट नंबर १४१ हे लिहून घेणार व सोलापूर महापालिका मिळकत नोंदसाठी सादर करणारे भोगवटदार यांनी ख्वाजाभाई शेख आणि त्याच्या साथीदारांकरवी फसवणूक केली.

स्टॅम्प पेपरवरील वर्षे कशाचे तरी सहाय्याने पुसलेले व त्यावर अॅड. एल.पी. देशपांडे व एच. एल. खान यांचा बनावट नोटरी कब्जा पावती व करार पत्र तयार करुन ते सोलापूर महापालिकेकडे मिळकत नोंद लावण्यासाठी सादर करुन सोलापूर महापालिकेची आणि मूळ जागा मालकाची फसवणूक केली आहे. हा प्रकार तपासात निष्पन्न झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मालमत्ता कर विभागाला दिले होते. याप्रकरणी एकास अटक करण्य आली. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. अधिक तपास फौजदार गाढवे हे करीत आहेत. या प्रकारामुळे हद्दवाढ भागात एकच खळबळ उडाली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments