आठवड्यातून किमान एक वेळ तहसीलदार यांनी...... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 30, 2025

आठवड्यातून किमान एक वेळ तहसीलदार यांनी......

 आठवड्यातून किमान एक वेळ तहसीलदार यांनी......

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आठवड्यातून किमान एक वेळ तहसीलदार यांनी महसुली गावात जाऊन तेथील लोकांशी चर्चा करावी, त्यांचे प्रश्न, समस्या ऐकून घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा. त्यातून त्यांचे प्रश्न सोडावे, असा जनसंवादाचा सोलापूर पॅटर्न तयार करावा  राज्य शासनाच्या फ्लॅगशिप उपक्रम व योजनांची महसूल अधिकारी कर्मचारी यांनी सविस्तर माहिती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढील सहा महिन्यात महसूल अंतर्गत ची सर्व कामे अत्यंत पारदर्शकपणे करून संपूर्ण राज्यात सोलापूर हा सर्वोत्कृष्ट महसुली जिल्हा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

     नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल विभागाच्या आढावा प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, तहसिलदार श्रीकांत पाटील, तहसिलदार दिनेश पारगे यांच्या सह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages