Hot Posts

6/recent/ticker-posts

शहराचा पाणीपुरवठा राहणार

 शहराचा पाणीपुरवठा राहणार आणखी एक आठवडा विस्कळीत



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहराला पाणीपुरवठा करणारी टाकळी ते सोरेगांव दरम्यानची मुख्य ४८ इंची पाईपलाईनला वडकबाळ नॅशनल हायवेलगत गळती लागल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. शहराचा पाणीपुरवठा एका रोटेशनसाठी पुन्हा एक दिवस उशिरा होणार आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा आणखी एक आठवडाभर विस्कळीतच राहणार आहे.


गळती दुरुस्तीचे काम शनिवार, ३१ मे रोजी सकाळी ८ वाजता हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामास बराच कालावधी लागणार असल्याने टाकळी- सोरेगाववरुन पाण्याचा उपसा होणार नाही. या दुरुस्ती दरम्यानच्या कालावधीत स्मार्ट सिटीअंतर्गत समांतर जलवाहिनीला सोरगाव येथे जोडणी करण्यात येणार आहे.


पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याने महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी सुधारित पाणी पुरवठ्याचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता तपन के यांनी केले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments