स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने उत्कृष्ट काम : दिलीप स्वामी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 31, 2025

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने उत्कृष्ट काम : दिलीप स्वामी

 स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने उत्कृष्ट काम : दिलीप स्वामी



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिरंजीव जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे नातू अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने अन्नदान सेवेबरोबरच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्यात येत आहे, असे गौरवोद्गार छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीपराव स्वामी यांनी व्यक्त केले.


छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी पदाचा दिलीप स्वामी यांनी नुकताच पदभार स्वीकारले. जन्मेजयराजे भोसले हे विविध कार्यक्रमानिमित्त जालना, छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन न्यासाच्या वतीने श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीपराव स्वामी बोलत होते. याप्रसंगी संतोष भोसले, लाला राठोड, रोहन शिर्के, रोहित खोबरे, अश्पाक काझी, शिवराज स्वामी, प्रशांत शिंदे, स्वामिनाथ गुरव, रमेश हळसंगी, संतोष माने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages