तेरा दिवसांपासून भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आंदोलन; शेतकऱ्यांचे होताहेत हाल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 31, 2025

तेरा दिवसांपासून भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आंदोलन; शेतकऱ्यांचे होताहेत हाल

 तेरा दिवसांपासून भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आंदोलन; शेतकऱ्यांचे होताहेत हाल



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभागाच्या वतीने सुधारित तांत्रिक वेतनश्रेणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे १५ मे पासून हे आंदोलन सुरु आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थिती माघार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या कार्यालयात शुकशुकाट आहे. कामासाठी आलेल्या नागरिकांना माघारी जावं लागत आहे. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.


एरवी नागरिकांच्या गर्दीनं भरलेलं हे कार्यालय आंदोलनामुळं ओस पडल्याचं दिसून आलं इकडे क्रर्मचारी वर्ग आंदोलन स्थळी ठाम आहे रास्त मागण्यासाठी लोकशाही मार्गानं आम्ही आंदोलन करत आहोत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना व्यक्त करण्यात आली. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनाच आंदोलन हे आता चिघळत चाललेलं असून कामकाज प्रभावित झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यावर तोडगा निघावा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages