अतिरिक्त, उपायुक्तांच्या विरोधात तक्रारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 30, 2025

अतिरिक्त, उपायुक्तांच्या विरोधात तक्रारी

 अतिरिक्त, उपायुक्तांच्या विरोधात तक्रारी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुरुवारी (दि. २९) दत्त चौकातील झोन कार्यलयात सर्व अधिकाऱ्यांना घेऊन जनता दरबार घेतला. यामध्ये परिसरातील नागरिकांनी २३ तक्रारी दाखल केल्या. या जनता दरबारात आयुक्तांना त्यांचेच सहकारी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्या विरोधातील तक्रारीला समोरे जावे लागले. ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या, ते अधिकारी जनता दरबारत हजर होते. तरीही आयुक्तांनी प्राप्त तक्रारीची दखल घेत जोगेवरच निपटारा केला.


गुरुवारी सकाळी ११ वजाता महापालिका आयुक्तांनी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्या तक्रारींचा जाब दरबारात उपस्थित नागारिकांना विचारला. एकूण २३ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये विभागीय कार्यालयाच्या संदर्भातच १२, नगररचना विभागाच्या विरोधात चार, विद्युत विभागाच्या विरोधात एक, अतिरिक्त आयुक्त नंबर दोन यांच्या विरोधात तीन तक्रारी, अतिरिक्त आयुक्त नंबर एक यांच्या विरोधात एक, उपायुक्तांच्या विरोधात चार तक्रारींचा समावेश होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक नगररचना संचालक मनिष भीष्णूरकर, नगरअभियंता सारिका आकूलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता तपन डंके उपस्थित होते.


चौकट 

सोमवार आणि गुरुवारी करा तक्रारी

शहरातील नागरिकांनी आपल्या समस्यांची तक्रार महापालिकेच्या माय सोलापूर या पोर्टलवर करणे अपेक्षित आहे. पण ज्यांना पोर्टलवर तक्रार करणे शक्य नाही, अशांनी विभागीय कार्यालयात सोमवार आणि गुरुवार या दिवशी तक्रार दाखल करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages