पंढरपूर तालुक्यात ९५०० हेक्टरवर खरीप पेरणीची तयारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 30, 2025

पंढरपूर तालुक्यात ९५०० हेक्टरवर खरीप पेरणीची तयारी

 पंढरपूर तालुक्यात ९५०० हेक्टरवर खरीप पेरणीची तयारी



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-पंढरपूर तालुक्यात पूर्व मोसमी पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावली आहे. पंढरपूर तालुक्यात सरासरी १६२ मिलिमीटर नोंद झाली आहे. तालुक्यातील ९ मंडलात कमी जास्त पावसाची नोंद झाली आहे. मान्सून सुरू होण्या अगोदरच पाऊस तालुक्यात जोरदार बरसला आहे. शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेतकरी आता जमिनीला वाफसा कधी येतो, याची वाट पाहत असून खरीप पेरणीची तयारी करु लागले आहेत. ९५०० हेक्टरवर खरीप पेरणीची तयारी करण्यात आली आहे.


पंढरपूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे ऊस पिकाला चांगला फायदा झाला आहे. तालुक्यात ऊसाबरोबरच फळबागांचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे पावसाबरोबरच आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंब, बोर यांना फटका बसला आहे. तर पपईच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे या फळबागांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जवळपास १५० शेतकऱ्यांचे १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच मका व बाजरीचेही नुकसान झाले आहे. आता आंब्याचा सिझन शेवटच्या टप्प्यात आला आहे. तालुक्यात झालेल्या पावसामुळे आंब्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. पावसाळा चालू असल्यामुळे आंब्याची विक्री ही घटली आहे.


यावर्षी पहिल्यांदाच उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व विहिरी काठोकाठ पाण्याने भरल्या आहेत. सर्व ओढे, नाले वाहू लागले आहेत. तालुक्यातील मोठे बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. सध्या पाटबंधारे विभागाने अनेक कालव्यांना पाणी सोडले आहे. परंतु पावसाने शेतातच पाणी साठल्याने शेतकऱ्यांना आता त्या पाण्याची आवश्यकता वाटत नाही.


चौकट

मक्याचे क्षेत्र वाढले

पंढरपूर तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा शेतकरी लवकरच खरिपाची पेरणी करण्याची तयारी करु लागले आहेत. यासाठी कृषी विभागदेखील सज्ज झाला आहे. यंदा ९५०० हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्याचे नियोजन आहे. पंढरपूर तालुक्यात मका २५५० हेक्टर, सोयाबीन ११० हेक्टर, उदीड १५० हेक्टर, तूर २५० हेक्टर, बाजरी ३०० हेक्टर, कापूस ५० हेक्टर नियोजन करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages