खाजगी शाळेतील ५८ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
प्राथमिक शाळा कृती समितीचा यशस्वी पाठपुरावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- खाजगी अल्पसंख्यांक प्राथमिक शाळेतील ५८ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात आले.समायोजनासाठी खाजगी प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीने केलेला पाठपुराव्याला यश आल्याची माहीती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
सन २०२३—२४ च्या संचमान्यतेनुसार खाजगी अल्पसंख्यांक शाळेतील मराठी,कन्नड व उर्दु माध्यमातील ५८ शिक्षक अतिरिक्त ठरले होते.या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात यावे.या मागणीसाठी शिक्षण उपसंचालक हारुन अत्तार,मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,राज्य शिक्षक सेना,युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला होता.प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी या शिक्षकांचे समायोजन तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात आले.यासाठी राज्य शिक्षक सेनेचे पश्चिम विभागीय अध्यक्ष सुनील जगताप,आप्पाराव इटेकर,आप्पासाहेब पाटील व अ.गफुर अरब,सचिन चौधरी यांनी प्रयत्न केले.
चौकट—कन्नड माध्यमातील शिक्षक २०१२ पासुन अतिरिक्त ठरले होते.मागील १३ वर्षापासुन त्यांच्या समायोजनाची प्रक्रीया प्रलंबित होती.त्यांचे समायोजन करुन शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी मागील १३ वर्षापासुन प्रलंबित प्रश्न मार्गी लावला आहे.त्यामुळे शिक्षकांनी त्यांचे आभार मानले.
0 Comments