“पाथमेकर्स
मराठी साहित्य परिषदेचा २०२४ मधील स्त्रीविषयक उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार “पाथमेकर्स या पुस्तकाला मिळाला आहे. विज्ञानाच्या क्षेत्राला स्त्रियांसाठी खुल्या करणाऱ्या आणि लिंगभेदाचा सामना करत विद्यालयाच्या क्षेत्रामध्ये भव्य कामगिरी करणाऱ्या बारा स्त्री शास्त्रज्ञ अर्थात पाथमेकर्स यामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. स्टेम अर्थात विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या चार विभागात आज महिला आघाडीवर असल्या तरी अद्याप त्यांना ५० टक्के प्रतिनिधित्व मिळाले नाही. मात्र सव्वाशे वर्षापूर्वी जेव्हा ही टक्केवारी शून्य होती, तेव्हा पहिल्या फळीतील महिला शास्त्रज्ञांना खूप संघर्ष करावा लागला.. त्यांची कहाणी म्हणजे पाथमेकर्स.. प्रत्येक स्त्री ने आणि प्रत्येक संवेदनशील पुरुषाने वाचले पाहिजे असे हे पुस्तक..
पहिली भारतीय शास्त्रज्ञ कमला सोहोनी, कर्करोगाशी झुंजणारी रणरागिणी डॉ. कमल रणदिवे, आयुष्यभर विज्ञानाची निष्ठा बाळगणारी जानकी अम्मल, विज्ञानात असीम कामगिरी करणारी असीमा मुखर्जी चॅटर्जी या महिला शास्त्रज्ञांचे जीवन आणि त्यांचे संशोधन वाचायला मिळेल. सोबतच प्रेरणेचा किरणोत्सार करणारी मेरी क्युरी, मानवतेची सच्ची पाईक असलेली लीझ माइटनर, संगणक प्रोग्रॅमची जननी ॲडा लव्हलेस, आधुनिक बीजगणिताची जननी एमी नोदर, कालसापेक्ष उपेक्षित शास्त्रज मिलेव्हा मारिक (आइनस्टाइन), जीवरसायनशास्त्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्या बार्बरा मॅकक्लिंटॉक, डोरोथी हॉजकिन, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करून संशोधनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या रोझलिंड फ्रैंकलिनचा डीएनए समजून घेता येतो.
भारतात किंवा जगभर महिलांना ज्या ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्या सर्व समस्या या पाथमेकर्सच्या पुढे अधिक पटीने होत्याच. मात्र त्यांनी या समस्यांवर मात करताना प्रचंड चिकाटी दाखवली.. म्हणूनच तुम्ही विज्ञान क्षेत्रात असा किंवा नसा, प्रत्येक महिलेने हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि प्रेरणा घेतली पाहिजे. पाथमेकर्स हे पुस्तक तुम्ही घरपोच मागवू शकता. ८९५६४४५३५७ या क्रमांकावर जीपे/ फोनपे ने २७० रुपये आणि व्हॉट्स अप वर पूर्ण पत्ता पाठवून द्या. तुम्हाला लेखकाच्या स्वाक्षरीसह पुस्तक घरपोच मिळून जाईल.
जगण्याला नवा आयाम देणाऱ्या “पाथमेकर्स”
लेखक : डॉ. नितीन हांडे
0 Comments