Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

 लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील पदवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात संपन्न झाला. सदरील निरोप समारंभ कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन हे लाभले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे व लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन फुगे हे लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली.  यांनतर महाविद्यालयातील विद्यार्थी आशिष पालवे, सोहम बोधले, प्रतीक्षा गुंड,आरती खुने, सायली सोनावणे,  दर्शना शिंदे, प्रतिभा शिंदे, राधिका घुगे, श्रेया टकले, निकिता ठावरे आदींनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील त्यांचा जीवनप्रवास, जिव्हाळा व अनुभव व्यक्त करत महाविद्यालयातील सुखद आठवणींना उजाळा देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदवावा व आपले ईच्छित ध्येय साध्य करावे असा मौलिक सल्ला देखील दिला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. सायली बडेकर, प्रा. अंकिता पवार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्याना त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी करावा अश्या मनस्वी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य सागर महाजन यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्याना भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यानप्रती त्यांचे अनुभव व जिव्हाळा व्यक्त केला. प्राचार्य  डॉ. अमोल शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक चार वर्षाच्या कालावधीत शैक्षणिक तसेच कला, क्रीडा क्षेत्रात संपादित केलेल्या दैदीप्यमान याच्याबद्दल विशेष कौतुक केले. महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढी सोबतच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यास कार्यबद्ध असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य डॉ सचिन फुगे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्याना महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या नैतिक मूल्यांची जपणूक आयुष्यभर करून एक चांगला नागरिक म्हणून स्वतःचे पर्यायाने महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सदरील कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन महाविद्यालयाच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नक्षत्रा कांबळे यांनी व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments