Hot Posts

6/recent/ticker-posts

संभाजी आरमारची पदयात्रेने संभाजी महाराजांना मानवंदना

 संभाजी आरमारची पदयात्रेने संभाजी महाराजांना मानवंदना



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीने शंभू प्रेरणा रॅली आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक अशी पदयात्रा काढण्यात आली.


छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांना अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ढोली- बाजाच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या जयघोषात जल्लोषपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. डोक्यावर भगवी टोपी परिधान करून हातात भगवे झेंडे घेऊन संभाजी आरमारचे असंख्य मावळे, माता-भगिनी, दिव्यांग बांधव या रॅलीत सहभागी झाले होते. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला.


याप्रसंगी आ. विजयकुमार देशमुख, छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष मतीन बागवान, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, शहरप्रमुख सागर ढगे, शिक्षक संघटना प्रमुख अजिंक्य पाटील, जिल्हा संघटक अमित कदम, उपजिल्हाप्रमुख सागर संगवे आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments