Hot Posts

6/recent/ticker-posts

जवानांसाठी ३१ जणांनी केले रक्तदान

 जवानांसाठी ३१ जणांनी केले रक्तदान


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती आणि युद्धात जखमी झालेल्या जवानासाठी जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पत संस्था एकच्या वतीने रक्तदान करण्यात आले आहे. यावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिवरत्न सभागृहातील त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त सीईओ संदीप कोहीणकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख उपस्थित होते.


देशासाठी युद्धात जखमी झालेल्या जवानासाठी रक्त संकलन करणे हे चांगले काम असल्याचे प्रतिपादन सीईओ जंगम यांनी केले. याप्रसंगी पतसंस्थेच्या सभासदांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना रोप, प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले.


डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपवार रूगणालयांचे रक्तकेंद्राचे प्रमुख डॉ. जयश्री खिस्ते, वैद्यकीय अधिक्षक डॉ. स्मिता गवळी, दिपक वनाळे उपस्थित होते. चेअरमन डॉ. एस. पी. माने, व्हाईस चेअरमन सुरेश कुंभार, वी.टी. मोहिते, दयानंद परिचारक, विष्णु पाटील, शहाजहान तांबोळी, श्रीधर कलशेटटी, तजमुल मुतवल्ली, विजयकुमार घेरडे, विशाल घोगरे, गजानन मारडकर, शिवानंद म्हमाणे, शिवाजी राठोड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments