Hot Posts

6/recent/ticker-posts

बुद्ध पौर्णिमेनिमित्त अन्नछत्र मंडळात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

 बुद्ध पौर्णिमेनिमित्त अन्नछत्र मंडळात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सोमवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून महाप्रसादाच्या उत्कृष्ठ व्यवस्थेने भक्तांनी समाधान व्यक्त केले.हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.सलग सुट्ट्यांनी झालेल्या गर्दीमुळे भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी न्यासाने महाप्रसादाची वेळ वाढवली होती.दरम्यान,न्यासाच्या महाप्रसाद गृहात मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा,धार्मिक कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींना नैवेद्य दाखविण्यात आले.स्वामी भक्तांनी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री शमी विघ्नेह गणेश मंदिर,ब्रह्मांडनायक उभी स्वामींची मूर्ती, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक,टेकडीवरील श्री समर्थ वाटिका,शिवचरित्र प्रदर्शन हॉल, आदी ठिकाणी भेटी देवून समाधान व्यक्त केले. यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, सौरभ मोरे, मनोज निकम, सनी सोनटक्के,निखील पाटील, अतिश पवार,गोटू माने, योगेश कटारे, सतीश महाप्रसादाचे 'उत्कृष्ट नियोजन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र न्यासाकडून महाप्रसादाचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन पाहून माझ्यासह स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केले.
- सुशांत निकम, स्वामी भक्त, वेंगुर्ले महिंद्रकर, शहाजी यादव, संजय गोंडाळ,बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, पिंटू हळ्ळुरे, संभाजीराव पवार,श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार,चंद्रकांत हिबारे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments