तेलंगवाडीच्या विकासरत्न नामदेवराव चव्हाण विद्यालयाचा शंभर टक्के निकाल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 16, 2025

तेलंगवाडीच्या विकासरत्न नामदेवराव चव्हाण विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

 तेलंगवाडीच्या विकासरत्न नामदेवराव चव्हाण विद्यालयाचा शंभर टक्के निकाल





 मोहोळ (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत तेलंगवाडी येथील विकासरत्न नामदेवराव चव्हाण विद्यालयातील बेचाळीस विद्यार्थ्यापैकी सर्व उत्तम गुणांनी पास झाल्याने विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. साक्षी सज्जन पासले 82.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, प्राची शिवाजी  दांडगे पुणे 81.20% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तर श्रेयस सिद्धेश्वर डोंगरे याने 79.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना संजय मुळे, श्रीकांत दाढे, स्वाती मोरे, रामचंद्र बंगाळे, जयराम बागुल,  नितीन गायकवाड, राजू गायकवाड व नंदकुमार सकट यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे संस्थाअध्यक्ष नागनाथ अण्णा चव्हाण, धनंजय चव्हाण, मुख्याध्यापक संजय मुळे, पालक व ग्रामस्थ यांनी सर्वांच्या अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages