Hot Posts

6/recent/ticker-posts

जिया जमादार 97.60 टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण

 जिया जमादार 97.60 टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संगमेश्वर पब्लिक कॉन्व्हेंट स्कूल ( सीबीसी पॅटर्न) ची विद्यार्थिनी कु. जिया जावीद जमादार 97.60 टक्के गुण मिळवून  दहावीच्या  परीक्षेत    घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचबरोबर तिने संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने पास होण्याचा बहुमान मिळविला आहे.
  कु. जिया जमादार हीने केंद्रीय शालांत प्रमाणपत्र परिक्षा 2024-25 या परिक्षेत इंग्रजी विषयात 100 पैकी 100 गुण, हिंदी 96 ,  मॅथेमॅटिक्स स्टॅंडर्ड  96, सायन्स 96  आणि सोशल सायन्स 97 व अतिरिक्त  कम्प्युटर अब्लिकेशन 99 गुण या प्रमाणे एकूण 600 पैकी 584 गुण  प्राप्त करीत आपल्या यशाचा झेंडा फडकाविला. या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या शिक्षकांनी व नातेवाईकांनी अभिनंदन करून कुमारी जिया हिस शुभेच्छा दिल्या आहेत. कुमारी जिया ही सिंगापूर येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले जावीद जमादार यांची द्वितीय कन्या आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments