Hot Posts

6/recent/ticker-posts

आ.रणजितसिंह व खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नामुळे येळीव येथे एमआयडीसी

 आ.रणजितसिंह व खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नामुळे येळीव येथे एमआयडीसी





कलूज (कटूसत्य वृत्त):- आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नामुळे,माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर, येळीव येथे एमआयडीसी होत असल्याने, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.  
      माळशिरस तालुक्यातील विकास हा मोहिते पाटील यांच्यामुळे  गगनाला भिडला आहे.माळशिरस तालुक्याचा मोठ्या प्रमाणात जरी विकास झाला असला तरी, एमआयडीसीची कमकरता भासत होती. माळशिरस तालुक्यात एमआयडीसी असावी हे जनतेचे स्वप्न होते. माळशिरस तालुक्यातील जनता वारोवार मोहिते पाटील यांच्याकडे एमआयडीसी व्हावी म्हणून साकड घालत होते. सतत होत असलेली जनतेची मागणी,तसेच नव्या पिढीला,बेरोजगार तरुणांना, रोजगार उपलब्ध होईल, उद्योगधंदे वाढतील या विचाराने,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सरकार दरबारी प्रयत्न केले.
      आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यात सदाशिवनगर, येळीव येथे एमआयडीसी व्हावी म्हणून वारंवार पाठपुरावा केला होता.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे,अजित पवार, उदय सामंत यांनी तालुक्यात एमआयडीसी मंजूर  केली होती.
          या पुढील टप्पा म्हणजे माळशिरस तालुक्यातील येळीव येथे नवीन सुरू होणाऱ्या एमआयडीसी मध्ये, महाराष्ट्र सरकारने व एमआयडीसी कार्यालय सोलापूर यांनी सर्व नवीन उद्योजकांना ते प्रोप्रायटर शिप कंपनी, पार्टनरशिप कंपनी असो किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, यांनी औद्योगीक जमिनीसाठी अर्ज करण्यात यावे म्हणून नोटिफिकेशन काढले आहे. तरी तालुक्यातील उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहिते-पाटील यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments