माजी नगरसेवक तौफीक शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी शहरच्या वतीने स्वागत सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तसेच राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबई येथे माजी नगरसेवक तौफीक भाई शेख माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी माजी नगरसेवक वहिदा शेख माजी नगरसेवक नूतन गायकवाड माजी नगरसेवक तस्लिम शेख ऍड वसीम शेख आसिफ राजे युनूस शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला त्याच अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या शुभहस्ते फेटा पुष्पगुछ देऊन राष्ट्रवादी भवन येथे स्वागत सत्कार करण्यात आला...
तसेच तौफीक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांचे सहकारी महंमद साब शेख, तोसिफ सगरी, जावेद शेख नौशाद शेख इम्रान शेख, रिजवान शेख, महिबूब शेख, अकील नायकवाडी तन्वीर शेख मौलाभाई शेख जावेद सय्यद इम्रान इस्माईल शेख या पदाधिकारी यांचा जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देण्यात आला व त्यांचे देखील स्वागत सत्कार करण्यात आला ..
कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी तौफिक भाई शेख हे पक्षात आल्याने पक्षाची ताकत वाढलेली आहे येणाऱ्या महापालिकेत निश्चित याचा फायदा पक्षाला होईल त्यांच्या सोबत आलेल्या सर्व मान्यवरांचे मी कार्याध्यक्ष मनापासून स्वागत करून शुभेच्छा देतो ....
राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे सर्व समाजघटकाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व असल्याने मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला येणाऱ्या काळात जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान व राष्ट्रवादीचे शहरातील सर्व पदाधीकारी यांच्या सोबतीने महापालिका निवडणुकीत दादांच्या विचारांचे नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज माझा व माझ्या सर्व सहकार्यांचे स्वागत व सत्कार केलात याबद्दल आपले मनापासून धन्यवाद मानतो..
राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वखाली व प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करते आपण त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला त्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपले मनःपूर्वक स्वागत करतो. मी व माझे पक्षातील सर्व सहकारी आपल्याला सोबत घेऊन महापालिका निवडणुकीमध्ये एक यशस्वी कामगिरी करून अजितदादाचे हात बळकट करूयात आपण पक्षात येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अधिकची वाढलेली असून अजितदादांचे विचार व पक्षाचे ध्येय धोरण सुनिल तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण सक्रिय व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो व आपणास पुढील कार्यास शुभेच्छा देतो असे मत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले
याप्रसंगी महिला अध्यक्ष संगीताताई जोगदंडकर ज्येष्ठ नेते हेमंत दादा चौधरी. जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारुख मटके प्रकाश जाधव ओबीसीं प्रवेश उपाध्यक्ष सलीम नदाफ ओबीसी प्रदेश सरचिटणीस बसवराज बगले चित्रपट सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर भास्कर आडके शकील शेख व्ही जे एन टी विभाग अध्यक्ष रुपेश भोसले वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख. सामाजिक न्याय विभाग अनिल बनसोडे वैद्यकीय मदत कक्ष बसू कोळी दक्षिण विभाग सभा कार्याध्यक्ष प्रदीप बाळ शंकर ओबीसी सेल कार्याध्यक्ष आयुब शेख मध्य विधानसभा अध्यक्ष आलम राज आबादीराजे शहर सचिव दत्तात्रय बनसोडे शहर सचिव निशांत तारा नाईक अर्चनाताई दुलंगे कामगार अध्यक्ष मार्कंडे शिंगारे कामगार कार्याध्यक्ष संजय सांगळे सागर गव्हाणे मेहबूब कादरी आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते...
0 Comments