Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकारी रुग्णालयात अधिष्ठात्यांचं 'ऑपरेशन'

 सरकारी रुग्णालयात अधिष्ठात्यांचं 'ऑपरेशन'



डॉक्टरांसह ११ कर्मचाऱ्यांवर 'ऑन द स्पॉट' कारवाई

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर सरकारी रुग्णालयात अधिष्ठात्यांनीच कामात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांसह ११ कर्मचाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनीच हे 'ऑपरेशन' केलं आहे.

सरकारी रुग्णालयाच्या कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका या कारवाई केलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर आहे.

डॉ. ठाकूर यांनी रुग्णालयातील ओपीडी, आयपीडीला अचानक भेट दिली. कामात कसूर करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांवर बेधडक कारवाई केली. त्यांच्या एका दिवसाचं वेतन कापलं आहे. शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना बाहेरची औषधे लिहून दिल्यास तात्काळ संबंधित डॉक्टर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. डॉ. संजीव ठाकूर हे रात्रीच्या सुमारास थेट रुग्णालयातील वॉर्डात गेले आणि त्यांनी विविध समस्यांबाबत रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी अॅक्शन प्लान तयार केला आहे. येणाऱ्या काळात सातत्याने कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments