माणसा तुला चालत राहायचे आहे
समजून घे स्वतःला
बुडवून नको टाकू भूतकाळाला
संघर्ष आता नवीन नाही
दररोज युद्ध ईथे आहे
कधी मनात युद्ध आहे
कधी कधी वादळ मनात आहे
समाजात तर रात्रंदिवस युद्ध आहे
असत्याचा बोलबाला आहे
मुखवट्याचे जीवन आहे
शत्रू कोण मित्र कोण ओळखणार कसं आहे
जो तो आपापल्या विश्वात अविरत गुंग आहे
ईथे जो तो हात हाती घेऊन पुढे निघून जातो
हात हाती घेऊन तसाच ठेवणारा विरळाच
असो हार जीत सहन करावे
सुख दुःख सारे समान
कवटाळून बसू नये
एवढे मात्र निश्चित कर्म तैसे फळ निश्चित आहे
श्रीकांत मोरे दिनांक १२/३/२०२५
0 Comments