Hot Posts

6/recent/ticker-posts

महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या चोरास २४ तासाच्या आत अटक

 महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या चोरास २४ तासाच्या आत अटक


नातेपुते (कटूसत्य वृत्त):- महिलाच्या गळ्यातील दागिने काढून घेणाऱ्या अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे राहणार मेडद तालुका माळशिरस या चोरास नातेपुते पोलिसांनी २४ तासाच्या आत तपास लावून अटक करून ८८ हजार रुपये चा मुद्देमाल जप्त केला. नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी  तपास करत असताना सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यात संदीप लवटे याच्यावर पाच गुणांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहेत.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळाल्या माहितीनुसार नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ०७ः३० वाजण्याच्या सुमारास वैभव विठ्ठल नष्ठे वय ३१ वर्षे रा. माळशिरस सोबत आई माया नष्ठे हे त्यांच्याकडील दोन चाकी स्कुटी गाडी नंबर एम.एच. ४५ ए व्ही.१२६१ या गाडीवरून शिंगणापूर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणाऱ्या बायपास रोडवर आले असता दोन अज्ञात इस्मानी त्यांच्या पाठीमागे येऊन माया विठ्ठल नष्ठे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने काढून मोटर सायकल वरून पळून गेले असता दिनांक ०८  एप्रिल २०२५ रोजी वैभव विठ्ठल नष्ठे वय ३१ वर्षे रा. माळशिरस यांनी नातेपुते पोलीस ठाण्याची संपर्क साधून सदर घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. नातेपुते पोलीस ठाणे यांनी सदर घडलेल्या घटनेबाबत गुन्ह्याची नोंद करून सदर घटनेचा तपास करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.ना. राकेश लोहार यांच्याकडे तपास करण्यासाठी दिला असता पो.ना. राकेश लोहार यांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत सदर गुन्हा करणारा सराईत रेकॉर्डवरील आरोपी मौजे मेडद तालुका माळशिरस येथील शिवारात संशयरीत्या फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने लोहार यांनी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांना माहिती दिली असता महारुद्र परजणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांना तात्काळ रवाना करून मौजे मेडद तालुका माळशिरस येथे सपोनी महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत दिघे, पो.ना. राकेश लोहार, रणजीत मदने, नितीन पनासे, असलम शेख यांनी सापळा लावून आरोपी अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे राहणार मेडद तालुका माळशिरस यास 
ताब्यात घेऊन चौकशी करून पोलिसी खाक्या दाखवले असता केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असता त्यास अटक करून त्याच्याकडून महिलेच्या गळ्यातून चोरून नेलेले २४ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याची ३० मोठ्या मन्याची पोत व २४ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याची ९२ लहान मन्याची पोत तसेच गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल आरटीओ पासिंग नंबर एम.एच. १४ झेड १५६ असा एकूण ८८ हजार रुपये चा मुद्देमाल आरोपी अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे राहणार मेडद तालुका माळशिरस याच्याकडून नातेपुते पोलीस ठाणे यांनी जप्त केला. त्याचा साथीदार फरार असल्याने त्याचा शोध घेणे सुरू आहे.आरोपी अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे याच्यावर सातारा शहर ,दौड , माळशिरस, म्हसवड, इंदापूर सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अध्यक्ष प्रीतम यावलकर, अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Reactions

Post a Comment

0 Comments