Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. इनामदार यांच्या वाढदिवसानिमित् अनाथालयास वीस हजारांच्या देणगीसह अन्नधान्य व फळे वाटप

 डॉ. इनामदार यांच्या वाढदिवसानिमित् अनाथालयास वीस हजारांच्या देणगीसह अन्नधान्य व फळे वाटप




अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य नाव... अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा ,सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम के इनामदार यांचा 10 एप्रिल रोजी वाढदिवस असतो या वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पंढरपूर येथील प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी व वा. ब. नवरंगे बालकाश्रमास प्रत्येकी दहा हजार रुपये असे एकूण 20 हजार रुपयांचा धनादेश आपल्या वाढदिवसानिमित्त संस्थेस सुपूर्द केला यावेळी पालवी संस्थेच्या सर्वेसर्वा मंगलताई शहा, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे ,कोंडबावीचे माजी सरपंच विष्णुपंत घाडगे,शहाजी आघाडे, निनाद पाटील,उद्योगपती संदेश सोनार पालवी  संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने डॉ. एम के इनामदार हे सातत्याने सामाजिक कार्यात सढळ हाताने मदत करीत असतात वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून समाज उपयोगी कार्यक्रम ते  दरवर्षी राबवीत असतात याच अनुषंगाने त्यांनी पंढरपूर येथील पालवी व नवरंगे अनाथालयास वीस हजार रुपयांची मदत केली यावेळी अभय मेडीकल चे अभय जोशी, गणेश इंगळे, विष्णू घाडगे ,निनाद पाटील ,शहाजी आघाडे संदेश सोनार यांच्या वतीने डॉ एम के इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त पालवी या संस्थेतील अनाथ मुलांसाठी कलिंगड, टरबूज, द्राक्ष, केळी  देण्यात आली याचबरोबर या संस्थेस गहू ,तेल, साखर, तांदूळ ,पोहे,गरा बिस्किट हे नित्य उपयोगी दैनंदिन वापरातील साहित्य डॉ एम के इनामदार यांच्या हस्ते संस्थेस वाढदिवसानिमित्त देण्यात आले .

चौकट

डॉ. एम के इनामदार हे वैद्यकीय क्षेत्रातील नाव जस मोठ आहे तसंच त्यांनी सामाजिक कार्यातही आपलं नाव मोठं केलं आहे आमच्या संस्थेस त्यांनी फळे व दैनंदिन वापरातील साहित्य तर दिलेच पण याचबरोबर त्यांनी वीस  हजार रुपयांची देणगी दोन्ही संस्थांना दिली यामुळे संस्थेत असणाऱ्या 200 पेक्षा जास्त मुलं व वृद्ध व्यक्तींना त्याचा लाभ मिळणार आहे यामुळे पालवी च्या वतीने आम्ही त्यांचं मनःपूर्वक आभार मानतो.

मंगल शहा, संस्थापक अध्यक्षा पालवी पंढरपूर
Reactions

Post a Comment

0 Comments