खा.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आहेरवाडी येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदासंघांतील दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी आहेरवाडी, कणबस या गावाला भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले.
यावेळी नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.
तसेच आहेरवाडी या गावात जिल्हा वार्षिक योजना सन २०२४ - २०२५ अंतर्गत खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून ३०५४/२०८१ ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अनुदान योजनेअंतर्गत आहेरवाडी, फताटेवाडी, तिल्लेहाळ (वाघमारे वस्ती मार्ग) खडीकरण, डांबरीकरण करणे या कामासाठी १४,४१,१६२ रुपये निधी मंजूर करण्यात आले. या निधीतून कार्यकारी अभियंता विभाग क्रमांक ०१ जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने होणाऱ्या कामाचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, नरसप्पा दिंडूरे, सरपंच सुवर्णा दिंडूरे, उपसरपंच रविराज पाटील, मल्लिनाथ कापसे, काशिनाथ वाघमारे, रुद्रप्पा बाके, बंडप्पा पाटील, आडव्यपा कोराळे, बसलिंग कांबळे, काशीराया बोराटे, सरपंच कांतय्या दुलंगे, उपसरपंच हणमंत नायकोडे, गंगाधर बनसोडे, सिद्धाराम थोरात, दत्ता कदम, सरुबाई कदम, सागर कदम, आप्पाशा धो बिंदगे, मल्लिनाथ चिट्टे, श्रीशैल बिंदगे, परसप्पा मुस्के, नागनाथ चिवडशेट्टी, बनसिद्ध नायकोडे, राजेभाई पटेल, रेवणसिद्ध चिट्टे, शिवानंद फुलारी, प्रभुलिंग बिराजदार, दत्ता कदम, सोमलिंग नायकोडे, सिद्धाराम कलशेट्टी, महेश नायकोडे, सचिन कदम, राहुल कदम, गंगाधर पुजारी, आप्पाशा डांगे, सोमलिंग मनापुरे, रमेश नायकोडे, मल्लिकार्जुन बिंदगे, नागनाथ कलशेट्टी, भिमाशंकर थोरात, शकील नदाफ, प्रभुलिंग सागरे, प्रविण नायकोडे, श्रीकांत नायकोडे, अमिर नदाफ, सद्दाम पटेल, महेश थोरात, सिद्धाराम सागरे, तिप्पाणा फुलारी व इतर गावकरी मान्यंवर उपस्थित होते.
0 Comments