डॉ. बनसोडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेनंतर संबंध आरोग्य यंत्रणेकडे संशयाने बघितलं जात असताना सोलापूर सिव्हिल मधील क्षयरोग विभागातील सावळा गोंधळ समोर आलाय. या विभागाच्या प्रमुखांकडून मनमानी सुरु असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले आहे.
सोलापूर सिव्हिल रुग्णालयात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम विभाग कार्यरत आहे. मात्र या विभागाच्या प्रमुख असणाऱ्या डॉ.श्रीमती मीनाक्षी बनसोडे या स्वतःची मनमानी करतायेत.या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देतात. क्षयरोग विभागाऐवजी कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्वतःची घरची कामे करायला भाग पाडतात. यांची घरची कामे न केल्यास त्यांच्यावर कारवाईचे किंवा ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. त्यामुळे घर कामासह गाडी धुणे , किराणा, भाजीपाला आणणे, लॉन्ड्री चे कपडे आणणे. नातेवाईकांचा पाहुणचार करणे अशी कामे कर्मचाऱ्यांना करावी लागतात असे या निवेदनात नमूद आहे.
डॉ.मीनाक्षी बनसोडे या सोलापूर सिव्हिल रुग्णालयात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मना प्रमाणे वागायला लावतात.न वागल्यास त्यांना नाहक कामाच्या ठिकाणी चुकीचा त्रास देतात.येथील खाजगी कर्मचाऱ्यांनी या विभागाला मोठ्या कष्टाने राज्यात मानाचे स्थान मिळवून दिल. मात्र बनसोडे मॅडम या कर्मचाऱ्यांचे अनेक भत्ते अडवून त्यांना नाहक त्रास देत आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांनी आरोग्य मंत्र्याकडे दाद मागितली आहे.
0 Comments