रस्त्याच्या निकृष्ट कामाप्रकरणी कारवाईसाठी धरणे आंदोलनाचा इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील मौजे पोखरापुरात रस्त्याचे काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप करत याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी गुरुवार दि. 24 एप्रिल 2025 रोजी मोहोळ पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संतोष नरुटे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
या गावात 2020 ते 2025 या सालामध्ये विविध योजनेअंतर्गत विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली मात्र यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करत संबंधित विभागाकडे तक्रारी अर्ज दिला होता. संबंधित ठेकेदार कंपनीच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संतोष नरुटे यांनी स्पष्ट केले.
सविस्तर माहिती अशी की, मोहोळ मौजे पोखरापूर, ता. मोहोळ येथील नामदेव वाघमोडे वस्ती ते शिवाजी माने वस्ती व नरुटे वस्ती ते महादेव वस्ती तसेच यावली रोड ते आनंद वाघमोडे वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण केलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे करुन उर्वरीत निधी हा संबंधीत ठेकेदार संस्था, सेक्शन इंजिनिअर व संबंधीत जी. ई. यांनी स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता वापरुन शासनाची फसवणुक केल्याने त्यांचेवर कायदेशीर कारवाई होवून संबंधीत ठेकेदार संस्था ब्लॅकलिस्टला टाकणे व संबंधीत सेक्शन इंजिनिअर व संबंधीत जी.ई. यांना बडतर्फ करणेत यावे. या मागणीसाठी दिनांक २४/०४/२०२५ रोजी मा. पंचायत समिती, मोहोळ येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार असलेबाबत मी मौजे पोखरापूर, ता. मोहोळ येथील कायमचा रहिवाशी असून आमचे पोखरापूर, ता. मोहोळ येथे सन २०२०-२०२५ या सालामध्ये विविध योजने अंतर्गत विविध विकास कामे करुन खुप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे असे निर्दशनास आले असल्याने मी दि. १७/०४/२०२५ रोजी संबंधीत विभागाकडे तक्रारी अर्ज दिलेले आहेत. त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे अपेक्षीत होते. परंतु अद्यापर्यंत संबंधीत ठेकेदार कंपनी विरोधात कोणतेही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मला नाईलाजास्तव पंचायत समिती मोहोळ येथे उपोषणास बसावे लागत आहे. २४/०४/२०२५ रोजी पर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही तर त्याच दिवसापासून मी पंचायत समिती मोहोळ येथे बेमुदत धरणे आंदोलणास बसणार आहे. असा इशारा संतोष नरुटे यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेत अक्षय गायकवाड उपस्थित होते.
0 Comments