Hot Posts

6/recent/ticker-posts

जागतिक पातळीवर चमकले "सुयश" चे नाव सुयश विद्यालय बार्शी च्या विद्यार्थ्यांचा विश्वविक्रम.

 जागतिक पातळीवर चमकले "सुयश" चे नाव सुयश विद्यालय बार्शी च्या विद्यार्थ्यांचा विश्वविक्रम. 




बार्शी  (कटूसत्य वृत्त):- दि.10 एप्रिल रोजी श्रीलंका ते भारत सागरी जलतरण 28km मॅरेथॉन इव्हेंट संपन्न झाला, यामध्ये सुयश विद्यालय बार्शीच्या जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला, यशस्वीरित्या समुद्र पोहून पार केला, आणि सुयश विद्यालय, बार्शी चे नाव भारत देशामध्ये उज्वल केले. दिनांक 10 एप्रिल 25 रोजी पहाटे 6 वाजून 10 मी. श्रीलंका येथील
तलाईमूनार पासून स्विमिंग सुरू झाली, पहिल्या पासूनच समूद्र खवळलेला होता, पूर्ण स्विमिंग हि लाटांच्या उलट दिशेने करावी लागणार होती, सर्व साधारणपणे 3-5 फूटांच्या काही ठिकाणी लाटा होत्या. श्रीलंका ते भारत हे अंतर तसं 28 किलो मीटर आहे परंतु खवळलेला समुद्र पाहून श्रीलंका नेव्ही ने रूट चेंज करण्यासाठी सांगितले, नंतर त्या रुटने स्विमिंग सुरू झाली, संध्याकाळी सहा नंतर भारतीय नौदल त्या समूद्रात पोहण्यासाठी परवानगी देत नाहीत. तरीदेखील आठ वाजेपर्यंत स्विमिंग चालू ठेवली. शेवटी अर्चलमूनाई किनारा हा एक किलो मीटर अंतरावर राहिला होता, त्यातील 500मिटर अंतर हे चालतच यावं लागतं, सर्व प्रथम रणवीर ने भारतीय किनाऱ्यावर पाय ठेवून हा इव्हेंट पूर्ण केला, त्या पाठोपाठ भार्गवी मुळे, शुभ्रा कडगंची यांनी ही हा इव्हेंट पूर्ण केला.बदललेल्या रुट मुळे साधारण 32-33किमी अंतर झाले.
अशा प्रकारे अडथळ्यांचा सामना करत जलतरणपटुंनी श्रीलंका ते भारत समुद्री अंतर पोहून यशस्वीरित्या पूर्ण केले...
यामध्ये सहभागी जलतरणपटू
 1) रणवीर राहुल सातपुते
 2) भार्गवी परीक्षित मुळे
 3) शुभ्रा विरेश कडगंची

यशस्वी जलतरणपटूंचे सुयश विद्यालयाचे संस्थापक  शिवदास नलवडे संस्थेच्या मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे , प्रसाद नलवडे, मुख्याध्यापक  सागर मंडलिक, क्रीडा शिक्षक अतुल जाधव, मार्गदर्शक बाळराजे पिंगळे तसेच पत्रकार.संतोष सूर्यवंशी यांनी कौतुक केले. तसेच सुयश विद्यालय,बार्शी कला सांस्कृतिक व शारीरिक शिक्षण विभाग व सुयश संकुलातर्फे हार्दिक हर्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments