शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने दहिगाव फुले वस्ती जि.प.शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
फुलेवस्ती, दहिगाव (ता. माळशिरस) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने सामाजिक दायित्वातून
पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल घेतली . या उपक्रमाचा शुभारंभ शिवप्रसाद उद्योग समूहाच्या डायरेक्टर ऋतुजाताई मोरे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतूने करण्यात आलेला हा उपक्रम समाजोपयोगी ठरेल. बोअरवेलमुळे शाळेतील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवली जाणार असून, विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळेल ही समाधानाची बाब आहे.शिवप्रसाद उद्योग समूहाकडून यापूर्वीही सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवले गेले आहेत. आजचा हा उपक्रम म्हणजे त्यांच्या सेवाभावी कार्याची आणखी एक साक्षच यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments