Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज मध्ये मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय आधिवेशन

 अकलूज मध्ये मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय आधिवेशन



 10 ते  12 मे तीन दिवस चालणार वैचारिक पर्वणी

सोलापूर (कटुसत्य वृत्त):-

मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारणीमध्ये ठरल्याप्रमाणे 2025 चे राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे आयोजित केले आहे. 10 ते 12 मे तीन दिवस  अधिवेशन चालणार आहे.अधिवेशन समाजासाठी वैचारीक पर्वणी ठरणार आहे.यापूर्वी 1998 मधे पंढरपूर येथे राज्यस्तरीय आधिवेशन यशस्वी रित्या पार पडले होते.

  आधिवेशनाच्या माध्यमातून जन जागृती, प्रबोधन व संघटन बळकटी व्हावी ह्या उद्देशाने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिवेशनाच्या नियोजना संदर्भात नुकतीच मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे, माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न झाली. राज्यभरातून येणारे सेवा संघाचे सर्व पदाधिकारी सभासद समाज बांधव भगिनी तसेच देशभरातून येणारे प्रतिनिधी यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था , प्रचार व प्रसार व्यवस्था यासोबत विविध विषयावरील व्याख्यान, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम याची अंतिम आखणी करण्यात आली.   संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर  व प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. सोलापूर जिल्हा व आसपासच्या जिल्ह्यातील समाज बांधवांसाठी हे वैचारिक आधिवेशान म्हणजे खर्‍या अर्थाने मोठी पर्वणी आहे. या आधिवेशनास जास्तीजास्त समाज बांधव आणि भगिनी उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा मान्यवरांनी बैठकीत व्यक्त केली.

Reactions

Post a Comment

0 Comments