निवृत्त आयएएस अधिकारी उज्वल उके युनिफॉर्म गारमेंट असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार पदी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संपूर्ण देशात अत्यंत नावाजलेल्या युनिफॉर्म गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सोलापूर च्या पहिल्या प्रदर्शनाला यशस्वीरित्या मार्गदर्शन करून त्यांना शासन दरबारी मदत मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेले निवृत्त उज्वल उके माजी सनदी अधिकारी (IAS) माजी अप्पर मुख्य सचिव व माजी वस्त्रौद्योग सचिव महाराष्ट्र शासन यांनी सोलापूर यूनिफॉर्म गारमेंट इंडस्ट्री ला भेट दिली. या भेटी दरम्यान सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने असोसिएशन च्या वेगवेगळ्या उपक्रमा मधे त्याच्या अनुभवाचे मदत मिळावी या साठी असोसिएशनच्या प्रमुख सल्लागारपद स्वीकारावे असे निवेदन दिले. व ते निवेदन त्यानी स्वीकारले असल्याची घोषणा अध्यक्ष निलेश शहा यांनी केली. या यशस्वी भेटी साठी आमदार सुभाष देशमुख यांचे मोलाचे साथ लाभले
शांत, निरोगी, आनंदी आणि मुक्त होमो सेपियन्स, निसर्गाशी एकरूप होऊन जगणारे असे व्यक्तिमत्व उज्वल उके आता युनिफॉर्म गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार पदी असणार आहेत. जेणेकरून देशात विदेशात गणवेश क्षेत्रात सोलापूरचे नाव आणखी उज्वल होईल. असोसिएशनचे गारमेंट चे प्रशिक्षण देणारे ट्रेनिग सेंटर उभारणे तसेच भारतातील पहिले यूनिफॉर्म गारमेंट पार्क उभारणे या प्रमुख उद्देशा मधे आमदार सुभाष देशमुख प्रयत्नशील आहेतच व आता या निवडी मुळे उज्वल उके यांचे सुद्धा अनुभव व मार्गदर्शन मदतीला येईल अशी पदाधिकाऱ्यांना अशा वाटते.
2017 ला सोलापूर युनिफॉर्म गारमेंट उत्पादक संघाच्या पहिल्या प्रदर्शनाला त्यांनी भरभरून साथ दिली होती. आणि त्याला साजेशी मेहनत सोलापूरच्या गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली त्यामुळेच आज त्याचे चित्र देशात अत्यंत यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
आता सोलापूरचा डंका विदेशात वाजवा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे या निवडीला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे भारत देशात व विदेशात देखील युनिफॉर्म गारमेंट प्रचंड लोकप्रिय होऊन सोलापूर करिता युनिफॉर्म गारमेंटचे उत्पादन वाढेल अशी आशा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
निवृत्त आयएएस अधिकारी उज्वल उके हे ठाणे येथील सहाय्यक जिल्हाधिकारी असताना ठाण्याकरिता जिल्हा आपत्ती आराखडा तयार केला. हा आराखडा पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्यात आला. हे विशेष असे अनेक प्रकल्प त्यांनी शासन दरबारी असताना राबविलेले आहेत.
एमआयडीसी अक्कलकोट रोड येथील रमेश डाकलिया यांच्या कारखान्यात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपाध्यक्ष सतीश पवार प्रकाश पवार श्रीकांत अंबुरे अजय रंगरेज शैलेंद्र गणाते रोहन बंकापूर व्यंकटेश मेंगजी जी आदी उपस्थित होते.
0 Comments