लोकमंगल कृषी सलंग्नित महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात व लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समता दिन म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनंत शेरखाने (विद्या प्रतिष्ठान कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय) हे लाभले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन, लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन फुगे, प्रा. स्वप्नील कदम, प्रा. निशा काटे, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. सायली बडेकर तसेच महाविद्यालयातील सर्व विदयार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे प्रा. अनंत शेरखाने यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, समाजातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेला त्याग याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ सचिन फुगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अतिशय खडतर परिस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी केला. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री पुरूष समानता, संविधान निर्माण, समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. प्रा. स्वप्नील कदम यांनी स्वतंत्र भारताचे सृजान नागरिक म्हणून आपण कायद्याचे पालन करणे हीच डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली असेल असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमृता माळी यांनी व आभारप्रदर्शन रोहन पवार यांनी व्यक्त केले.
0 Comments