डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सरबत वाटप.
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते याचेच औचित्य साधून सालाबाद प्रमाणे आझाद युवा फाउंडेशनच्या वतीने सरबत वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान टेंभुर्णी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सरबत वाटप कार्यक्रमाची सुरुवात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांनी आझाद युवा फाउंडेशन बद्दल बोलताना सांगितले की मी दोन वर्षांपासून पाहत आलो आहे आझाद युवा फाउंडेशन कायमच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत असतात असेच कायम सामाजिक सलोख्याचे कार्य करत रहा आज टेंभुर्णी शहरातील व परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व समाजातील कार्यकर्त्यांना आपण सरबत वाटप करून मनाला शांत व थंड वाटत आहे असेच काम आजादीवा फाउंडेशनने पुढेही चालवावे व सर्व समाजाचा सामाजिक सलोखा राखण्याचे काम करावे
या वेळी टेंभुर्णी सरपंच प्रतिनिधी भाजपा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, तिसऱ्या आघाडीचे नेते सुरज देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष औदुंबर देशमुख,आर पी आय तालुका संघटक परमेश्वर खरात, शिवसेना शहर प्रमुख सुरेश लोंढे, कैलास सातपुते सर, युवा नेते यशपाल लोंढे, शिवसेनेचे अमोल धुमाळ, आरपीआयचे जयवंत पोळ, ग्रामपंचायत सदस्य गौतम कांबळे, अय्युब पटेल, संतोष साळवे, माजी सरपंच अनिल जगताप, वंचित आघाडीचे राहुल चव्हाण ,बाळासाहेब गायकवाड,शब्बीर शेठ जहागिरदार, माजी उपसरपंच अण्णा देवकर , टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य वैभव महाडिक- देशमुख, सामाजिक कार्यकर्ते गोरख देशमुख ,नागेश बोबडे,आण्णासाहेब ढवळे, वंचितचे विशाल नवगिरे, ॲड तुकाराम राऊत,राहुल टिपाले,विजय कोकाटे,आझाद युवा फाउंडेशन चे अध्यक्ष अजीज शेख, उपाध्यक्ष समीर जहागिरदार, इम्तियाज सय्यद, अमिर काझी,डॉ शहाजहान काझी,फारुख देशमुख, फारुख सय्यद व मान्यवर,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments