Hot Posts

6/recent/ticker-posts

निमगाव चा मल्ल पै.विराज सावंत कुमार महाराष्ट्र केसरीचा मानकरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

 निमगाव चा मल्ल पै.विराज सावंत कुमार महाराष्ट्र केसरीचा मानकरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार





नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल,पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय 17 वर्षाखालील 45 वी कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत निमगाव ता.माळशिरस येथील व सध्या पुणे येथील गोकुळ वस्ताद तालमीत सराव करत असलेला मल्ल विराज आबासो सावंत याने कुमार महाराष्ट्र केसरी 2025 चा मानकरी झाला असून त्याच्या या यशाबद्दल निमगाव ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. 

     विराज सावंत याने शानदार कामगिरी करत कुमार महाराष्ट्र केसरी चा किताब जिंकला. गोकुळ वस्ताद तालमीचे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत आले असून गोकुळ वस्ताद तालमीचे प्रमुख वस्ताद राष्ट्रीय खेळाडू आणि किताबांचे मानकरी सागर हरिश्चंद्र बिराजदार हे आहेत.रुस्तुम-ए-हिंद-केसरी हरिश्चंद्र बिराजदार यांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं मामांनी आजवर अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल तसेच महाराष्ट्र केसरी व दिग्गज मल्ल तयार केले त्यांच्या विचारांचा वारसा सागर बिराजदार हे चालवित आहेत. 2009 साली विजय बनकर यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता तब्बल सोळा वर्षानंतर सागर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ वस्ताद तालमीला विराज सावंत यांच्या रूपाने कुमार महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली आहे. 

   विराज सावंत याने 2025 चा कुमार महाराष्ट्र केसरीचा किताब मिळविल्याबद्दल निमगाव ग्रामस्थांच्या वतीने सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ मगर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी सरपंच हनुमंत पवार,उपसरपंच नंदकुमार पाटील ,युवराज मगर ,चंद्रकांत मगर  निनाद पाटील,बाळासाहेब मगर,भारत मगर, जगन्नाथ पांढरे, लक्ष्मणराव पवार ,माऊली मगर, ॲड.शेखर मगर,आबसो सावंत,नंदकुमार पाटील,दत्तात्रय मगर,जयसिंग मोरे ,नितीन मगर,शंकर सावंत, रणजीत मगर ,रवींद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments