Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ शहरातील विविध प्रश्न तातडीने सोडवा

 मोहोळ शहरातील विविध प्रश्न तातडीने सोडवा



पोखरापूर : (कटुसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील मुख्य रस बंद असलेले तसेच रस्त्याच्या कडेला वाहतुकीस अडथळा असणारे पोल काढण्यात यावेत, वाहनधारकांना उड्डानपुलाखाली पार्किंग व्यवस्था करण्यात यावी तसेच मोहोळ-वैराग रस्ता अधिग्रहण करुन त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा, तालुक्यातील शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून विहिरींना मंजुरी मिळावी आदी मागण्यांचे निवेदन उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.

मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांना देण्यात आलेल्या निवेदनात, शहरातील नागरिकांना येवती पाणी पुरवठा व भुमिगत गटारीच्या कामामुळे खांदलेल्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे, अनेक ठिकाणी चेंबर उघडे आहेत. त्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर कामे लवकर पूर्ण करण्यात यावी. शहरातील मेन रोडवर मध्यभागी बंद व रस्त्यालगत असलेले पोल अडथळा ठरत आहेत ते लवकर काढावेत. उड्डानपुलाखाली असणाऱ्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. मोहोळ शहरात यात्रा काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घ्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात अनगर अप्परचे दप्तर शासकिय रेकॉर्ड मोहोळ तहसिल येथे जमा करुन घेण्यात यावे, शिरापूर उपसा योजनेसाठी बॅरेज बंधारा करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

चौकट 1
यांची होती उपस्थिती
तालुकाप्रमुख अशोक भोसले, काकासाहेब देशमुख, बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक सिमाताई पाटील, सत्यवान देशमुख, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख महेश देशमुख, विधानसभा संघटक विक्रम देशमुख, शिवरत्न गायकवाड, विनोद आंबरे, संतोष चव्हाण, दिलीप टेकाळे, विजय गायकवाड, दादा पवार, संतोष माळी आदींसह मोहोळ शहर व तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments