स्वातंत्र्य सेनानी संदिपान गायकवाड स्मृतिदिनी
महाआरोग्य शिबिराचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्य सेनानी संदिपान दादा गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन व स्वातंत्र्य सेनानी स्व. संदिपानदादा गायकवाड कृषिरत्न पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. कौशिक गायकवाड यांनी मोहोळ नागरी पतपुरवठा संस्थेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या महाशिबिराचे उद्घाटन न्यायाधीश जयराज वडणे यांच्या हस्ते तर अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ.सुहास व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून स्वातंत्र्य सेनानी संदिपानदादा गायकवाड कृषिरत्न पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या हस्ते तर रोटरी क्लबचे जिल्हा संचालक वसंतराव मालुंजकर यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी सव्वा पाच वाजता होणार आहे.
मोहोळ येथे स्वातंत्र्य सेनानी संदिपानदादा गायकवाड बहुउद्देशीय व संशोधन संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने संदिपान दादा गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्वातंत्र्य सेनानी संदिपानदादा गायकवाड सभागृह येथे मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिरात हृदय, मेंदू, मणके, यकृत, किडनी, अर्धांग वायू, ब्रेनस्ट्रोक, स्त्रीरोग, नेत्र, कृत्रिम अंग प्रत्यारोपण, तपासणी व उपचार शस्त्रक्रियासह बीपी, शुगर, थायरॉइड, ईसीजी, रक्ताच्या सर्व चाचण्याही विनामूल्य केल्या जाणार आहेत.
या महाशिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये न बसणाऱ्या योजनेतील रुग्णांवर उपचारासह शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून पुढील काळात संपूर्ण मोहोळ तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये जाऊन तपासणीसह उपचार करण्यात येणार आहेत. तरी पंचक्रोशीतील सर्व गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी राकेश देशमाने +91 96899 57196, शैलेश गावडे +91 98503 45773, अनिल नाईक +91 9860024622, विजय कोकाटे +91 98905 94577 मुस्ताक शेख +91 9860659586 यांच्याशी संपर्क साधावा. असे असे आवाहन डॉ.कौशिक गायकवाड यांनी केले. याप्रसंगी चंद्रमोळी पतसंस्थेचे चेअरमन राजेश खपाले, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नाना डोके, उपसरपंच विजय कोकाटे, श्रीकांत गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, अनिल नाईक, शैलेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर भर
शिक्षण आणि आरोग्यविषयक सोयी सुविधा असणे काळाची गरज आहे. महाआरोग्य शिबिरामध्ये राज्य शासनाच्या योजनेत न बसणाऱ्या आजार तपासणीसह शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. कॅन्सरसारख्या आजाराची गावागावात जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्य, शिक्षण सुधारणाकडे संस्थेचा प्रयत्न राहणार आहे.
-डॉ. कौशिक गायकवाड,संस्थापक अध्यक्ष
0 Comments