'आदिनाथ' साठी राजू शेट्टींची शनिवारी सभा
करमाळा (कटूसत्य वृत्त):-आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आदिनाथ शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी खा. राजू शेट्टींची शनिवार, दि. १२ एप्रिल रोजी करमाळा तालुक्यात करमाळा शहर व आदिनाथ कारखाना परिसरात जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती आदिनाथ शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांनी दिली.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, गेल्या चार-पाच वर्षे बंद पडलेला आदिनाथ कारखाना सहकारी राहिला पाहिजे, आदिनाथ शेतकरी विकास पॅनल सोडून उभा असलेले दोन पॅनल 'कारखाना स्वतःच्या घशात घालण्यासाठी या निवडणुकीत उतरले आहेत. जर हा कारखाना प्रा. रामदास झोळ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ताब्यात दिल्यास आम्ही हा कारखाना उत्तम चालवू. तरी शनिवार, दि.१२ रोजी होणाऱ्या जाहीर सभेस करमाळा व जामखेड तालुक्यातील शेअर्स धारक जास्तीत जास्त ऊस उत्पादक सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शेट्टी, स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र गोडगे, दशरथ कांबळे, जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केले आहे.
0 Comments