Hot Posts

6/recent/ticker-posts

सीता मातेच्या मूर्तीसाठी आ. खरेंकडून लाखाची मदत

 सीता मातेच्या मूर्तीसाठी आ. खरेंकडून लाखाची मदत

पोखरापूर : (कटुसत्य वृत्त):- रामनवमीनिमित्त मोहोळ येथील चाटी गल्ली परिसरातील श्रीराम मंदिरात आमदार राजू खरे यांनी दर्शन घेतले. व लोकांच्या मागणीनुसार सीता मातेच्या मूर्तीसाठी स्वखर्चातून एक लाख रुपये दिले.
मोहोळ शहरातील चाटी गल्ली परिसरात असलेल्या श्रीराम मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून रामनवमीला मोठा उत्सव असतो. या ठिकाणी मोठे धार्मिक कार्यक्रम होतात. श्रीराम मित्र मंडळाच्या सदस्यांनी आमदार खरे यांच्याकडे मंदिरातील सिता मातेच्या नवीन मूर्तीसाठी मदत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार खरे यांनी स्वखर्चातून मूर्तीसाठी एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
रामनवमी निमित्त आमदार खरे यांनी श्रीराम मंदिरात येऊन दर्शन घेत शब्द दिल्याप्रमाणे रोख एक लाख रुपये श्रीराम मित्र मंडळाच्या सदस्यांकडे सुपूर्द केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, शिवसेनेचे शहरप्रमुख विक्रम देशमुख, शिंदे गटाच्या शिवसेनेचे अजय कुर्डे, सर्फराज सय्यद, श्रीराम मित्र मंडळाचे हरिभाऊ गोटे, उमेश गोटे, समीर गोटे, राहुल तावस्कर, दिनेश मोहोळकर, सोमनाथ पुराणिक, श्रीशैल निस्ताने, अभिजीत मोहोळकर, विजय मोहोळकर, शशिकांत गोटे, उदय पुराणिक, शिवाजी निस्ताने, सोमा निस्ताने, महेश गवळी आदीसह नागरिक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments