सोलापुरातील मिरवणुकीत फक्त एक टॉप, एक बेसच लावा
सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणूक रविवारी (दि. २०) निघणार आहे. या मिरवणुकीत एक बेस आणि एकच टॉप स्पीकर लावत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाची मर्यादा पाळावी. शांततेच्या मार्गाने डॉ. आंबेडकर जयंती साजरी होण्यासाठी पोलीस आपल्या पाठीशी असल्याचे मत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शांतता कमिटी बैठकीत केले.
पोलीस आयुक्तालयात सोमवारी दि. ७ झालेल्या बैठकीत दोन्ही मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त राजन माने, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, यशवंत गवारी, सुधीर खिडकर, महापालिकेचे सारिका कुलवार, आरटीओचे अधिकारी, महावितरण, अग्निशामक, धर्मादाय आयुक्तचे अधिकारी यांच्यासह राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, के डी. कांबळे, अजित गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, आनंद चंदनशिवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले, महामानव डॉ. आंबेडकर जयंती ही साजरी करण्यात टॉप तीनमध्ये सोलापूर हे प्रथम क्रमांकावर आहे. नागपूर तिसऱ्या तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमण यांनी केले. प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे यांनी केले. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी देशमुख पाटील वस्ती, देगाव नाका येथून येणाऱ्या मिरवणुका येतात. या मंडळांसाठी मिरवणुकीत गाड्या सजवण्यासाठी त्यांना फौजदार चावडी ते भैय्या चौक दरम्यान जाणारा रस्ता दिला जाईल.
0 Comments