मनोरमा बँकेचा गीत रामायण कार्यक्रम उत्साहात साजरा
सोलापूर :(कटुसत्य वृत्त):- मोरे परिवाराच्या तिसऱ्या पिढीकडूनही लोकहिताची कामे केली जात असून या लोकहितामुळेच शहर आणि जिल्ह्यात मनोरमा परिवार प्रत्येकाला आपला वाटत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील यांनी केले.
मनोरमा बँक आणि मनोरमा मल्टीस्टेट सोसायटी यांच्यावतीने रामनवमीनिमित्त कवी ग. दि. माडगूळकर लिखित व सुधीर फडके संगीतबद्ध केलेल्या गीत रामायणाचे रंगभवन या सभागृहात आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. बसवराज शास्त्री यांनी प्रारंभी आशीर्वचन केले. याप्रसंगी श्रीकांत मोरे, शोभा मोरे, अस्मिता गायकवाड, प्रमोद बिराजदार, गुरू वठारे, डॉ. सुमित मोरे, अॅड. सुरेश गायकवाड, डॉ. आदित्य पाटील, डॉ. ऋचा मोरे, दत्ता मुळे आदी उपस्थित होते. बँकेचे अधिकारी शिल्पा कुलकर्णी यांच्यासह नीलकंठ करंडे, कमलाकर पुजारी, चंद्रकांत येमलवार, संतोष धमगोंडे, नयना भोसले, अंजली मोरे, कविता कुलकर्णी, श्रीदेवी पाटील, पल्लवी कदम यांच्यासह बँक कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
0 Comments