खा. प्रणिती शिंदे यांनी पानमंगरूळ ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- सोलापूर लोकसभा मतदासंघांतील अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून रोजी पानमंगरूळ या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणिती शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले.
यावेळी नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी, प्रकाश हिप्परगी, संगप्पा जमादार, कासीम तांबोळी, मलिक मुजावर, सचिन बनसोडे, अण्णाप्पा अरबळे, संतोष कुंभार, श्रीशैल करजगी, अशोक दोड्याळ, पुंडलिक पुजारी, बसण्णा लोहार, मल्लिकार्जुन मानशेट्टी, जक्कप्पा पुजारी, इब्राहिम मुजावर, लक्ष्मण पुजारी, शिवयोगी पुजारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments