दिल्ली येथे जल संसाधन स्थायी समितीची बैठक संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- नवी दिल्ली येथे जल संसाधन संबंधी स्थायी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष राजीव प्रताप रूडी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली,यावेळेस समितीचे सदस्य म्हणून खा.धैर्यशील मोहिते-पाटील हे देखील बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत देशातील सिंचन प्रकल्पांच्या स्थितीचा आढावा घेऊन,त्यांचा कार्यक्षम अंमलबजावणीवर भर देण्यात आला. गंडक नहर सिंचन प्रकल्पाची सविस्तर चर्चा झाली. या प्रकल्पातील प्रलंबित कामे आणि येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, आवश्यक उपाययोजना सुचविण्यात आल्या. तसेच, देशातील प्रमुख, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला गेला.
शेतकऱ्यांच्या जल व्यवस्थापनातील सहभाग वाढवण्यासाठी सहभागी सिंचन व्यवस्थापन (PIM) यावर विशेष भर देण्यात आला. तसेच, जल वापरकर्ता संघटना (WUA) सशक्त करण्यासाठी तांत्रिक व आर्थिक मदत वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
ड्रिप सिंचन आणि स्प्रिंकलर सिंचन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून जलसंधारणाला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
0 Comments