Hot Posts

6/recent/ticker-posts

भगवंत महोत्सवानिमित्त वृक्ष संवर्धन समिती कडून मंदिराची स्वच्छता

 भगवंत महोत्सवानिमित्त वृक्ष संवर्धन समिती कडून मंदिराची स्वच्छता




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भगवंत जयंती निमित्त होणाऱ्या भगवंत महोत्सवा चे औचित्य साधून वृक्ष संवर्धन समिती बार्शी मार्फत भगवंत मंदिराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी हेल्थ क्लब बार्शी तसेच कर्मवीर ढोल ताशा पथक बार्शी यांचे सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला सर्व मंदिर झाडून काढून स्वच्छ करण्यात आले. मंदिरातील गाभाऱ्यात देखील स्वच्छता करण्यात आली. मंदिराचे खांब पुसून स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर पाण्याने सर्व मंदिर धुऊन स्वच्छ करण्यात आले.
बार्शी शहर व परिसरात दररोजच्या श्रमदानातून वृक्षारोपण तसेच संवर्धन वृक्ष संवर्धन समिती मार्फत केले जाते. त्याचबरोबर वृक्ष संवर्धन समिती मार्फत महापुरुषांच्या जयंती तसेच भगवंत जयंती निमित्त गेल्या चार वर्षापासून स्वच्छता मोहीम राबविले जाते.
सकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जवळजवळ शंभर लोकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला .
मंदिर स्वच्छतेनंतर मंदिरातील पुजारी सुशांत बडवे यांनी वृक्ष संवर्धन समितीचे उमेश काळे, हेल्थ क्लब बार्शीचे भगवान लोकरे आणि कर्मवीर ढोल ताशा पथकाचे हर्षद लोहार यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.
शेवटी संदीप पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments