समांतरचे काम एप्रिलमध्ये पूर्ण करून मे मध्ये चाचणी घ्या
सोलापूर - (कटुसत्य वृत्त):- सोलापूर शहरासाठी १७० एमएलडीची उजनी समांतर जलवाहिनीचे काम एप्रिलअखेर पूर्ण करा आणि मे च्या पहिल्या आठवड्यात चाचणी घ्या, अशा सक्त सूचना जलसंपदा विभागाचे अप्पर सचिव दीपक कपूर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जलसंपदा विभाग अप्पर सचिव दीपक कपूर ह सोलापूर दौऱ्यावर आले होते. शुक्रवार १८ एप्रिल रोजी महापालिकेच्या सभागृहात महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठ्याच्या कामाचा आणि पाणीपुरवठ्याच्या योजनांचा आढावा घेतला. बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे पुण्याचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. ह. धुमाळ, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धरज साळे, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता खांडेकर, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील पाणीपुरवठा, नवीन उजनी दुहेरी पाईप लाईन, यशवंत जलाशय योजना (उजनी पाईप लाईन), भीमा नदी योजना (टाकळी) एकरुख माध्यम प्रकल्प (हिप्परगा तलाव) इत्यादी संदर्भातील माहिती दिली. सोलापूर ते उजनी दुहेरी १७० एम एल डी नवीन पाईप लाईनचे काम एप्रिल अखेर काम पूर्ण करण्यात यावे तसेच मे महिन्या मध्ये चाचणी घेणे बाबत सूचना दीपक कपूर यांनी केल्या.
चौकट १
योग्य नियोजनाच्या दिल्या सूचना
पाणीपट्टीची रक्कम दर महिन्याला जलसंपदा विभागास भरावी, नदीकाठच्या पाणी उपसाचे योग्य नियोजन करा. बेकायदा पाणी उपसाला आळा झाला. सध्या उन्हाळा चालू आहे, उजनी धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे, त्यामुळे पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देखील दीपक कपूर यांनी यावेळी दिल्या.
0 Comments