डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांची जागतिक सन्मानास पात्र निवड
अंतराळात जाणार कार्य आणि छायाचित्र !
अकलूज (कटूसत्य वृत्त):- भारताच्या सामाजिक क्षेत्रात गेली चार दशके अविरत सेवा देणाऱ्या, नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या आणि अनेक राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरविण्यात आलेल्या डॉ. स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते-पाटील यांना एक अनोखा आणि ऐतिहासिक सन्मान लाभला आहे.
ग्रीफिप्त युनिव्हर्सिटी, क्वीनसलँड ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त उपक्रमातून "प्लॅटिपस" या उपग्रह मोहिमेअंतर्गत लाँच साईट ब्राऊन ऑर्बिटल स्पेस स्पोर्टअर्थ या ठिकाणाहून एप्रिल २०२५ मध्ये एक खास अंतराळ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत जगभरातील निवडक प्रतिभासंपन्न आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे छायाचित्र, नाव व कार्य अंतराळात पाठवले जाणार आहे. या मान्यवर यादीमध्ये भारताचे अभिमान असलेल्या डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांची निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने त्यांचा अधिकृत बोर्डिंग पास व ए फोर सर्टिफिकेट जारी केला असून, या उपक्रमाचे प्रायोजक म्हणून ग्लॅमर स्पेस टेक्नॉलॉजी, क्वीनसलँड सरकार, डिलॉइट आणि एरबस हे आघाडीचे संस्थान सहभागी आहेत.
तसेच रशियन स्पेस एजन्सी सेटेलाइट 239 अल्फेरोव अंतरीक्ष सोयुझ रॉकेट या सॅटॅलाइट द्वारे वोस्तोच्नी कॉस्मोड्रोम येथून एप्रिल 2025 मध्ये लाँच होणार आहे. स्पेस कॅप्सूलमध्ये त्यांचे कार्य व फोटोग्राफ इन्स्टॉल करून ते स्पेस कॅप्सूल त्या त्या प्लॅनेटवर सोडणार आहेत. जगातील काही नामवंत व्यक्तींचीच यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकीच डॉक्टर स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील एक आहेत. रशियन स्पेस एजन्सीद्वारेही त्यांच्या कार्याचा गौरव – "अल्पेरोव-२३९" या उपग्रहातून देखील त्यांचे नाव, छायाचित्र व माहिती अंतराळात पाठवली जाणार आहे.
डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांचे कार्यक्षेत्र : अंध, अपंग, अनाथ, झोपडपट्टीमधील गरजूंसाठी चाळीस वर्षांहून अधिक काळ निस्वार्थी सेवा, वृद्धाश्रम उभारणी, एड्सग्रस्तांसाठी निवारा केंद्र, नक्षत्र गार्डन, बॉटनिक गार्डन, स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना, शिवशंकर को-ऑपरेटिव्ह बाजार व शिवकीर्ती महिला लघुउद्योग उभारणी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय व अध्यात्मिक क्षेत्रात अभूतपूर्व योगदान राहिले आहे.
तसेच डॉक्टर स्वयंप्रभादेवी यांना आजवर नोबेल वर्ल्ड पीस पुरस्कारासाठी २०२३ मध्ये नामांकन, वर्ल्ड काँस्टिट्यूशन अॅण्ड पार्लमेंट असोसिएशन, USA सदस्यत्व, अमेरिकन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन व इतर देशांच्या डॉक्टरेट पदव्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, इंडिया पोस्टमार्फत सन्मानार्थ टपाल तिकिटाच्या माध्यमातून त्यांचा गौरव झाला आहे. अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांचे जीवनकार्य, छायाचित्र आणि माहिती आता पृथ्वीच्या पलीकडे, अवकाशात अजरामर होणार आहे. हे त्यांच्या कार्याचे, त्यांच्या निस्वार्थ सेवेचे आणि भारताच्या सामाजिक मूल्यांचे अंतराळातील दस्तावेज ठरणार आहे.
0 Comments