संकल्प गणेश मंदिराचा बुधवारी लोकार्पण सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 21, 2025

संकल्प गणेश मंदिराचा बुधवारी लोकार्पण सोहळा

संकल्प गणेश मंदिराचा बुधवारी लोकार्पण सोहळा



दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तीर्थ येथे शरणव्वा बिराजदार, रामलिंग बिराजदार यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या संकल्प गणेश मंदिराचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहीती काशिनाथ बिराजदार यांनी दिली आहे. यानिमित्त 23 व 24 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या अमृतहस्ते लोकार्पण सोहळा, गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण असे उपक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास अक्कलकोट येथील म.नि.प्र. बसवलिंग स्वामीजी, नागणसूर येथील श्री.ष.ब्र. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी आदी उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी सकाळी आठ वाजता गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल. अकरा वाजता प्रवचन तर दुपारी साडेबारा वाजता महाप्रसादाचे वाटप होईल. त्यानंतर विविध धार्मिक विधी होतील. 24 एप्रिल रोजी सकाळी साज वाजता होम हवन, पूजन, अकरा वाजता गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण होईल. त्यानंतर धर्मसभा होणार आहे. तसेच भाविकांना महाप्रसादाचे वाटप होईल. धार्मिक विधीचे वैदिकत्व सिध्दारूढ स्वामीजी, बसवराज शास्त्री, मल्लय्या स्वामी, रेवणय्या स्वामी आदी करणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वनाथ बिराजदार, काशीनाथ बिराजदार आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages