Hot Posts

6/recent/ticker-posts

मौलाना आझाद पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांचा या स्पर्धात्मक युगात देखील यशस्वीपणे वाटचाल - प्रा. डॉ. सरफराज शेख

 मौलाना आझाद पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांचा या स्पर्धात्मक युगात देखील यशस्वीपणे वाटचाल - प्रा. डॉ. सरफराज शेख




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर मौलाना आझाद पॉलिटेक्निक येथील विद्यार्थ्यांचा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप देत असताना या स्पर्धेच्या युगात आमच्या पॉलिटेक्निकचे विद्यार्थी तग धरून असल्याचे मत प्रा.  डॉ. एस एन शेख यांनी सांगितले.

सोलापूर होटगी गाव येथील मौलाना जात पॉलीटेक्निक कॉलेजमधील सेमिनार हॉलमध्ये संपन्न झालेल्या या निरोप समारंभाच्या वेळी ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अमिरोद्दीन शेख हे होते तर स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष बेईमानवरून आदरणीय शिक्षक विजयकुमार बालाजी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

पुढे बोलताना शेख म्हणाले की एम. एस. बी.टी. इ. परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला त्यांच्या या यशाबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला स्पर्धात्मक युगात आमच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयातील विद्यार्थी तग धरून आहे संस्थेकडून त्यांना बौद्धिक धडे देण्यात येतात त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिला जातो तसेच गरीब विद्यार्थ्यांना फीत सवलत देऊन त्यांना मदत देखील केली जाते असे सांगितले. 

यावेळी एम. एस. बी. टी. ई. हिवाळी 2024 च्या परीक्षेत सर्व विभागातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट आउटगोइंग विद्यार्थी कुमार मोहम्मद अकमल शेख व कुमारी विभाग कौसर पठाण यांनाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

संस्थेबद्दल जिव्हाळा आणि आठवण  राहावे म्हणून अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने विशेष स्मृतीचिन्ह देण्यात आली. जी भविष्यात त्यांच्या संस्मरणात राहतील. विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव आणि भावना शेअर केल्या. महाविद्यालया विषयी त्यांनी आपुलकी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ खराडी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम. ए. पटेल सर गिरगावकर, सर गाडेकर सर, मोईन शेख सर, गवंडी सर, नीता वाघमारे मॅडम, नाझिया मॅडम व सर्व शाखा प्रमुख यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments