पडळकरच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेड च्या वतीने मंगळसूत्र दाखवून केले निषेध आंदोलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी ब्रिगेड च्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर याच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोर म्हणून त्याची कुख्याती आहे तोच धागा पकडून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळसूत्र चोर चा बॅनर घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी मंगळसूत्र दाखवून पडळकर च्या वक्तव्याचा निषेध केला
काही दिवसापासून संभाजी ब्रिगेड बद्दल वेगवेगळी वक्तव्य करीत आहे
पडळकर हे धनगर बांधवांना आरक्षण मिळवून देतो असे जाहीर आश्वासन देऊन सुद्धा धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाहीत
बिरोबाची खोटी शपथ घेऊन भाजपाला मत देऊ नका म्हणणारे आज भाजपचेच काम करत आहे
अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर व धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचे काम पडळकर करीत आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला
संभाजी ब्रिगेड ही पुरोगामी महाराष्ट्राच्या हात बळकट करणारी संघटना संभाजी ब्रिगेडची लढाई इथल्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधात आहे मात्र पडळकर हे महामानवांना ज्या व्यवस्थेने छळले त्या व्यवस्थेला बळकट करण्याचे काम पडळकर करीत आहेत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म हिंदू धर्मात झाला असला तरी त्यांनी अन्न धर्मीयांचा आदर केला आहे हे सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या विरुद्ध विचाराने काम करत असून त्याचा प्रचार प्रसार पडळकर करत आहेत मराठा वंजारी, मराठा धनगर, मराठा ओबीसी मध्ये वाद लावून त्याला खतपाणी घालण्याचे काम पडळकर करत आहेत तसा त्यांचा अजेंडा आहे
संभाजी ब्रिगेडने नवी दिशा नवा विचार हे सूत्र ठेवून हजारो युवकांना उद्योग व्यवसायासाठी परदेशातील संधी उपलब्ध करून दिलेली आहे संपूर्ण राज्यात 25 जिल्ह्यांमध्ये बिजनेस कॉन्फरन्स आयोजित करून युवकांना उद्योग व्यवसायाकडे वळवण्याचे काम संभाजी ब्रिगेड करीत आहे हाच संभाजी ब्रिगेड चा खरा अजेंडा आहे
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहर सचिव सिद्धाराम सावळे शहर संघटक शेखर कंटीकर शहर संघटक सतीश वावरे दिलीप निंबाळकर अभिषेक जाहीरदार शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद वैभव धुमाळ शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनिता घंटे शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी आदी उपस्थित होते
0 Comments