बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गुप्त बैठका
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गुप्त बैठका वाढल्या आहेत. येत्या काही दिवसांत अनेक घडामोडी घडणार आहेत. भाजपच्या तिन्ही आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. माजी सभापती दिलीप माने यांची कोणतीही भूमिका अद्यापपर्यंत समोर आले नाही. मात्र, बैठका झाल्याचे सांगण्यात येत आहे. आ. विजयकुमार देशमुखांकडे जायचं की, आ. सुभाष देशमुखांनी हातमिळवणी करायची किंवा पालकमंत्री व्हाया आ. कल्याणशेट्टी यांच्यासोबत राहायचं, यातील कोणता निर्णय घेतात, हेही पाहावे लागणार आहे. सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे यांनी यापूर्वी आ. कल्याणशेट्टी सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. काका साठेंची भूमिका गुलदस्त्यात आहे. पुढचे धोके ओळखून नेतेमंडळी सावध पाऊल टाकत असल्याची चर्चा सुरू आहे.
0 Comments