शहाजीबापूंनी भरसभेत थोबाडीत मारून घेतले, खासदार धैर्यशील
मोहिते पाटलांनी मीठ चोळले, म्हणाले, '
अकलूज (कटूसत्य वृत्त):-सांगोल्यातील मंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार समारंभात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी 'ज्यांनी पाणी अडवलं, त्यांना खासदार केलं आणि जो पाणी देणार आहे, तो घरात बसून आहे, असे म्हणत स्वतःच्या थोबाडीत दोन हाणून घेतल्या. शहाजीबापूंनी ज्या खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका करत स्वतःच्याच थोबाडीत हाणून घेतले त्या खासदार मोहिते पाटलांनी शहाजीबापूंची खिल्ली उठवली आहे.
'लोकांनी अभ्यास करून मतं टाकली आहेत. मी काठावर निवडून आलो नाही. एक लाख 24 हजारांनी निवडून आलोय. र, या लोकांची कामं असती तर मी निवडून आलो असतो का? ते ज्येष्ठ आहेत त्यांची विषयी आदर आहे. माझ्याविषयी ते खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतील तर मी त्यांच्या पद्धतीने उत्तर देणार नाही. कामाच्या पद्धतीने उत्तर देऊ.', असे म्हणत शहाजीबापूंच्या पराभवाच्या जखमेवर खासदार धैर्यशील मोहित पाटील यांनी मीठ चोळले.
'शहाजीबापू पाटील यांना कायम प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे. विधान परिषदेचे अनेक जागा रिकाम्या आहेत. वरिष्ठांनी संधी द्यावी. आपण सक्रिय असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न ते करत आहेत.', असाही टोला मोहिते पाटीलांनी लगावला.
सोलापूर जिल्ह्याला एक सुसंस्कृतपणा होता. विजयसिंह मोहित पाटीलसाहेब परिचारकसाहेब, गणपतआबा देशमुख असतील एकामेकांच्या तालुक्याचे पूरक राजकारण या लोकांनी केले. पुरक विकास केलाय. उजनी धरणातील पाणी उचलायचे ही योजना गणपत देशमुखांनी मंजुर केली होती. त्या योजनेचे पाणी त्यांनी (शहाजीबापू) स्वतःच्या गावी नेले, असे देखील मोहिते पाटील म्हणाले, विधानसभेच्या वेळी देखील यांनी सांगितेल की देवढा निधी आणला येवढी कामं केली. पण महाराष्ट्राचा निकाल आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल वेगळा आहे. यांनी शांत मनाने विचार केला पाहिजे. शहाजीबापू पहिल्यांदा आमदार झाले ते माळशिरसाच्या 14 गावांमुळे आणि यांनी ज्या 14 गावांनी आमदार म्हणून पाठिंबा दिला त्याच गावांचे पाणी बंद करण्याचे काम केले, असा गंभीर आरोपही मोहिते पाटील यांनी केला.
0 Comments