अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या सामाजिक न्याय जथ्थेची जोरदार सुरुवात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अनादी काळापासून भारतात स्त्री समुदायांवर बलप्रयोग, अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, तुच्छतेची वागणूक दिले जात असे. महिलांना रूढी - परंपरा आणि संस्कृतीच्या व आचार विचाराच्या बंधनात अडकवून त्यांच्या वैयक्तिक प्रगतीला खीळ घालण्याचे काम इथल्या व्यवस्थेने जाणीवपूर्वक केले आहे. त्यामुळे सामाजिक अन्यायाची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मालिकेची शृंखला तोडण्यासाठी सामाजिक न्याय जथ्था कामी येईल असे मत सामाजिक न्याय जथ्थे च्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय जथ्था महाराष्ट्रात 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे निवासस्थान राजगृह येथून जथ्थेची सुरुवात करण्यात आली.त्याच अनुषंगाने 28 एप्रिल रोजी सोलापुरात संघटनेचे राज्याध्यक्ष माजी नगरसेविका कॉ नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून जथ्था ची सुरुवात करण्यात आली. या जथ्था चे उद्घाटन माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी केले.
हा जथ्था छत्रपती संभाजी महाराज अभिवादन करून पुढील मार्गे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले,
कॉ.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, थोर मानवतावादी डॉ.व्दारकाणात कोटणीस, राष्ट्रपिता महात्मा गांधीं, महाराणी लक्ष्मीबाई महाराणा प्रताप, जगज्योती महात्मा बसवेश्वर, सुभाषचंद्र बोस, राजमाता अहिल्यादेवी होळकर,
चार हुतात्मा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ समारोप करण्यात आला.
यावेळी राज्याध्यक्ष माजी नगरसेविका कॉ नसीमा शेख म्हणाल्या की, महिला ही संस्कृतीची, कुटुंबाची आणि समाजाची खरी शिल्पकार आहे. तिच्या कर्तृत्वानेच समाज घडतो. पण दुर्दैवाने आजही आपल्या देशात आणि समाजात महिलांवर अत्याचार होतात, त्यांचे हक्क पायदळी तुडवले जातात.
कधी बलात्कार, कधी हुंडाबळी, कधी लैंगिक शोषण, तर कधी घरातच होणारा कौटुंबिक छळ – असे अनेक प्रकार महिलांना सहन करावे लागतात. घर, जे सुरक्षिततेचे प्रतीक असते, तिथेच जर महिलेला शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक हिंसाचाराला सामोरे जावे लागले, तर ती जखम अधिक वेदनादायक ठरते.
कौटुंबिक हिंसाचार ही फक्त मारहाणीपुरती मर्यादित समस्या नाही. मानसिक त्रास देणे, स्वातंत्र्यावर बंधने घालणे, आर्थिक शोषण करणे, किंवा सतत अपमान करणे हे सुद्धा कौटुंबिक हिंसेचेच प्रकार आहेत. अनेक महिला या हिंसेविरोधात आवाज उठवत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते – समाजाची, लोकलज्जेची, कुटुंब मोडण्याची.
पण आता वेळ आली आहे की, आपण सर्वांनी मिळून या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे.
महिलांना त्यांचे हक्क, आत्मसन्मान, आणि सुरक्षितता मिळाली पाहिजे.
सरकारने जरी कठोर कायदे केले असले, तरी समाजात जागरूकता निर्माण केल्याशिवाय खऱ्या बदलाची सुरुवात होणार नाही.
आज आपण शपथ घेऊया –
कोणत्याही प्रकारच्या हिंसेविरोधात आवाज उठवू. पीडित महिलेला मदतीचा हात देऊ.आपल्या घरात, शाळेत, समाजात मुलांना लहानपणापासून स्त्रियांकडे आदराने पाहायला शिकवू.
महिला सशक्त झाल्या तरच समाज सशक्त होईल!
यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. आवेशपूर्ण शब्दांत सामाजिक न्याय जथ्थे चा संदेश दिले.
प्रजा नाट्य मंडळाचे शाहीर प्रशांत म्याकल,अरुण सामल,चंद्रकांत मंजुळकर,अंबादास रच्चा,आदींनी लोकगीते व क्रांतिकारी गीते सादर करत जथ्था यशस्वी केले.
यावेळी सीटू चे राज्य महासचिव ॲड एम एच शेख, माकपचे माजी नगरसेविका कामिनी आडम, ॲड अनिल वासम, युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण,विद्यार्थी आघाडीचे जिल्हा मल्लेशम कारमपुरी, आशा संघटनेचे राज्य सचिव पुष्पा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
या जथ्थेचा सांगता समारोप संघटनेचे जिल्हा सचिव कॉ.शकुंतला पाणीभाते यांनी केले.
सदर जथ्था यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सुनंदा बल्ला,लिंगवा सोलापूरे,फातिमा मडकी,जलालबी शेख, तबसुम शेख, गीता वासम,हसीना शाभाई,रसूल शेख, सावित्रा गुंडला,सुरेखा पाटील,चंद्रकला गुर्रम, बालमणी शीलगारी, यमुना गड्डम, सलीम मुल्ला,नागेश म्हेत्रे, अशोक बल्ला, युसुफ शेख,संजीव ओंकार,दीपक निकंबे,अभिजीत निकंबे, विजय हरसूरे, किशोर मेहता, रफिक मकानदार,सनी शेट्टी रमेश बाबू, बाबू कोकणे, नरसिंग म्हेत्रे अंबादास बिंगी, शिवानंद श्रीराम, रफिक काझी, आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments