महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रेच राष्ट्रवादीने केले जल्लोषात स्वागत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंदाच्या ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे ते ४ मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून काढण्यात येणाऱ्या मंगल कलश रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .
पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रेचे काल रात्री धरमपीठ नातेपुते येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला तेथे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त यांनी स्वागत केले त्यानंतर माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा येथे ठिकठिकाणी मंगल कलश रथाचे स्वागत करण्यात आले आज 4 वाजता महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रेचे सोलापूर शहरात आगमन झाले या रथाचे स्वागत सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ढोल ताशे गजरात दांड पट्टा तलवारबाजी लाठी काटी या मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करीत महीला पारंपरिक वेशात तसेच कार्यकर्ते भगवे फेटे निळ्या रंगाच्या टोप्या अल्पसंख्यांक समाजातील युवकांनी नमाजाची पांढरी टोपी सेवादलने गांधी टोपी परिधान करून सामाजिक सलोख्याचे अनोखा समतोल साधत मंगलमय वातावरणात फटाक्यांची आतषबाजीत करीत जोरदार जल्लोषात उत्साहात स्वागत केले ..
महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथामधील मंगल कलशाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून गुलाब पाकळ्यांची उधळण करीत स्वागत केले पश्चिम महाराष्ट्र रथ यात्रेचे प्रमुख लतीफभाई तांबोळी यांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ....
या ठिकाणी सोलापूरच्या पावन भुमिचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचे अभिषेक जल अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज अभिषेक जल पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत मार्कंडेय महामुनी अभिषेक जल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शने पावन झालेली वळसंग विहिरीतील जल असे जल कलश स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे शहीद चार हुतात्मे यांच्या बलिदानातून पावन झालेल्या भुमितील माती कलश भरून आणले होते त्यांची पुजा करण्यात आली ते सर्व जल कलश आणी पावन माती कलश महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथामधील मोठ्या दोन कलशात समर्पित केले...
पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महाराष्ट्र गौरव यात्रेचे प्रमुख लतीफभाई तांबोळी यांनी या यात्रेचा उद्देश स्पष्ट करताना संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली त्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची माहीती आजच्या युवा पिढीला व्हावी त्याकरता महाराष्ट्र गौरव महोत्सव साजरा करण्यात येत आहे अशी माहीती दिली ...
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव श्रीनिवास कोंडी अनिल उकरंडे हेमंत चौधरी महेश निकंबे चंद्रकांत दायमा आनंद मुस्तारे बाबा बाई सालार जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर महिला कार्याध्यक्ष चित्राताई कदम प्रदेश सचिव इरफान शेख सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का महेश कुलकर्णी साजिद शेख दत्ता बडगंची सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष अनिल बनसोडे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष आशुतोष नाटकर सहकार सेल अध्यक्ष भास्कर अडकी अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष संजय मोरे ओबीसी विभागाचे कार्याध्यक्ष आयुब शेख वैद्यकीय विभागाचे शहराध्यक्ष बसवराज कोळी शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे विनायक रायकर शामराव गांगर्डे कार्यालयीन सचिव दत्ता अण्णा बनसोडे कामगार संघटनेचे अध्यक्ष मार्तंडे शिंगारे कार्याध्यक्ष संजय सांगळे सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोटीवाले प्रकाश झाडबुके प्रदीप बालशंकर शत्रुघन माने सागर गव्हाणे विकास काकडे महेश वटकर प्रभाग नागटिळक नईम सालार अश्फाक कुरेशी नवाज हुंडेकरी मोईज मुल्ला जहीर शेख अतीक शेख आनंद इंगळे ऋतिक वाघमारे आशिष कदम हार्दिक सरवदे वैभव कांबळे सामय्या हनुमानला अलमला रोहित गायकवाड राहुल वाघमारे बब्बू अडडेवाले सुरेखा ताई घाडगे शोभाताई गायकवाड लक्ष्मी पवार सुनिता ताई बिराजदार स्वामी ताई मीनाताई जाधव अर्चनाताई दुलंगे रेणुका मंद्रूपकर मीना जाधव आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.
0 Comments